जळगाव – राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर या शुक्रवार, दिनांक २७ नोव्हेंबर, २०२० रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचे दौऱ्याचे नियोजन कार्यक्रम पुढीलप्रमाणे –
शुक्रवार दि. २७ नोव्हेंबर, २०२० रोजी सकाळी ६.३८ वा. जळगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन व शासकीय वाहनाने अजिंठा शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी ६.५० वा. शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी ११.०० वा. महिला व बाल विकास विभागाची आढावा बैठक, स्थळ- जिल्हा परिषद सभागृह, जळगाव.
दुपारी १२.०० वाजता कोविड-१९ बाबत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक व संबंधित अधिकारी यांचे समवेत आढावा बैठक. स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव. दुपारी १.०० ते २.३० वा. अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व राखीव. दुपारी २.३० वा. शासकीय विश्रामगृह, जळगाव येथून शासकीय वाहनाने कॉग्रेस भवन, शास्त्री टॉवरजवळ, जळगावकडे प्रयाण. दुपारी ३.०० ते ४.०० वा. कॉग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेसमवेत भेट व चर्चा. स्थळ-कॉग्रेस भवन, शास्त्री टॉवरजवळ, जळगाव. सायंकाळी ४.०० वा. पत्रकार परिषद, कॉग्रेस भवन, शास्त्री टॉवरजवळ, जळगाव. सायं. ४.३० वा. जळगाव येथून शासकीय वाहनाने अमरावतीकडे प्रयाण.