जळगाव – शहरातील बेंडाळे चौकात मासे घेण्यासाठी आलेल्या पेंटरची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना बुधवारी रात्री घडली. शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.बेंडाळे चौकात मासे घेण्यासाठी आलेल्या पेंटरची दुचाकी लंपास .
रफिकखान रहेमान खान (वय-३३ रा. खंडेराव नगर, पिंप्राळा) हे पेंटरचे काम करतात. कामासाठी त्यांच्याकडे (एमएच १९ सीटी ९०५८) क्रमांकाची दुचाकी आहे. दररोजचे पेटींग करण्याचे काम आटोपल्यानंतर बुधवारी सायंकाळी ६ वाजता घरी गेले. त्यानंतर रात्री ८ वाजेच्या सुमारास मासे घेण्यासाठी दुचाकीने शहरातील बेंडाळे चौकात आले.
दुचाकी पार्कींगला लावली. मासे घेतल्यानंतर पुन्हा दुचाकीजवळ आले असता दुचाकी मिळून आली नाही. शोधाशोध करूनही मिळून न आल्याने शनीपेठ पोलीसात धाव घेतली. रफिकखान यांच्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना. भिला पाटील करीत आहे.