जळगाव प्रतिनिधी । शहरातील खोटे नगर भागातील विठ्ठलवाडी येथील एका अपार्टमेंटमधून बुधवारी दुपारी शिक्षकाची दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. धरणगाव तालुक्यातील वंजारी येथील स्वामी पार्क, विठ्ठलवाडी किशोर पुरूषोत्तम पाटील (वय-३८) हे शाळेत शिक्षक म्हणून काम करतात. त्यांनी महिन्याभरापुर्वीच स्वामी पार्क येथे नवीन प्लॅट घेतला होता.
त्यांच्याकडे (एमएच १९ सीके ८७६८) क्रमांकाची दुचाकी आहे. बुधवारी २५ नोव्हेंबर रोजी सकाळी दुचाकी अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये लावली होती. दुपारी ३ वाजता बँकेत जाण्यासाठी निघाले असता दुचाकी मिळून आली नाही. त्यांनी इतरत्र शोधाशोध केली मात्र मिळून आली नाही. तालुका पोलीसात धाव घेवून घटनेची माहिती दिली. किशोर पाटील यांच्या फिर्यादीवरून रात्री उशीरा तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास विलास पाटील करीत आहे.