जळगाव प्रतिनिधी – नशिराबाद जवळील सरस्वती फोर्ड या कार शोरूम मध्ये मालक मुकेश टेकवाणी आणि पुत्र एम डी धवल टेकवाणी यांनी सहकारी महिलेसोबत पैश्यांच्या वादातुन गैरवर्तन केले. याप्रकरणी पिडीत महिलेच्या फिर्यादीवरुन नशिराबाद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, ब-हाणपुर येथील तरूणी सरस्वती फोर्ड शोरूम मध्ये कार्यरत होती. इन्शोरन्सचे ग्राहकांडून 30 हजार रुपये घेतल्याचा खोटा आरोप पीडीत तरुणीविरूध्द करण्यात आला. हा आरोप खोटा असल्याचे सांगण्यासाठी तरुणी गेली असता तिच्यासोबत मुकेश व धवल टेकवाणी या दोघांनी गैरवर्तन करीत अश्लिल शिवीगाळ केली. तसेच तरुणीस जीवे ठार मारण्याची धमकी देत चोरीच्या खोट्या गुन्ह्यामध्ये अडकविण्याची धमकी दिली.
याप्रकरणी पीडीत तरुणीच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीसात भाग 5 गुरनं 201/2020 नुसार भादंवि 354 अ, 385, 341,323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक रार्जेंद्र साळुंखे हे करीत आहेत.
पोलीसांचा धाक दाखवुन पैसे वसुल
सहकारी तरुणीला तिने न घेतलेले 30 हजार रूपये तिच्याकडून वसुल करण्यासाठी पोलीसांचा धाक दाखविण्यात आला तसेच एका ठिकाणी बांधुन ठेवण्यात आल्याचे पीडीत तरुणीने सांगितले. साधारण कुटुंबातील असल्याने खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून तुझे करिअर बरबाद केले जाईल अशी धमकीही दोघं पिता पुत्राने दिल्याचे तरुणीने सांगितले. माध्यम प्रतिनिधीशी बोलताना ति खुप भयभित होती. दरम्यान दोघंही संशयीत आरोपींवर काय कारवाई पोलीस करतात याकडे लक्ष लागुन आहे.