मुंबई – महाराष्ट्रात दिवसभरात 5 हजार 439 नवीन कोरोना रुग्ण आढळले असून 4 हजार 86 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण 16 लाख 58 हजार 879 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.69 टक्के इतका झाला आहे.
सध्या राज्यात 83 हजार 221 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आज 30 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातील मृत्युदर हा 2.61 टक्के इतका झाला आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 3 लाख 66 हजार 579 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 17 लाख 89 हजार 800 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. 6 हजार 211 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत .
आज राज्यात 5 हजार 439 नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे . त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या ही 17 लाख 89 हजार 800 इतकी झाली आहे .
मुंबईत दिवसभरात 939 रुग्णांची नोंद झाली तर दिवसभरात 404 जण कोरोनामुक्त झाले . मात्र विविध शारीरिक आजार असलेल्या 19 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला .
मुंबईत 19 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 10 हजार 706 झाली आहे . मुंबईत कोरोनामुक्त होणाऱ्यांची एकूण संख्या 2 लाख 52 हजार 903 वर पोहोचली आहे . कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 91 टक्क्यांवर आले आहे तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 218 दिवसांवर पोहोचला आहे . मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या आता 10 हजार 666 इतकी आहे .
दरम्यान , मुंबईत आतापर्यंत 18 लाख 662 चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या 2 लाख 77 हजार 446 वर पोहोचली आहे .