जळगाव प्रतिनिधी । एमआयडीसी पोलीस ठाण्यात 1 लाख 69 हजार 290 रुपयांच्या गांजा तस्करीच्या गुन्ह्यात फरार आरोपीस शिरपूर जि. धुळे येथून अटक केली आहे.
पुढील कारवाईसाठी एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.गांज्याची तस्करी करणाऱ्या संशयिताला शिरपुरातून अटक. रामचंद्र रामदास पावरा वय 34 रा. महादवे ता. शिरपूर ता.धुळे असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी त्याच्या गावातून अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी त्यास एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात द देण्यात आले. शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून शेख युसूफ शेख मुसा हा एमएच 12 के एन 5169 क्रमांकाच्या चारचाकी वाहनातून गांजाची वाहतुक करतांना आढळून आला होता.
त्याला अटक करुन त्याच्याकडून 1 लाख 69 हजार 290 रुपये किंमतीचा 33 किलो गांजा जप्त करण्यात आला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. यातील संशयित आरोपी रामचंद्र रामदास पावरा हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. रामचंद्र हा शिरपुर तालुक्यातील महादेव या गावी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली.
त्यांनी संदिप पाटील, प्रवीण मांडोळे यांच्या पथकाला संशयितास अटक करण्याच्या सुचना केल्या. त्यानुसार पथकाने महादेव गावात सापळा रचून रामचंद्र याला ताब्यात घेतले. त्याला पुढील कार्यवाहीसाठी एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.