जळगाव प्रतिनिधी । अट्टल गुन्हेगारास रामानंद नगर पोलिसांनी केली अटक. जिल्ह्यातील विविध भागात घरफोडी आणि दुचाकीची चोरी करणारा अट्टल गुन्हेगारास आज स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोपडा तालुक्यातील सुटकार या राहत्या गावातून येथून अटक केली आहे. प्रदीप लोटन कोळी (वय-२७) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
रामानंदनगर हद्दीत चोरीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी रामानंद नगर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यांच्यावर रामानंद नगर पोलीस स्टेशन आणि चोपडा शहर पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल आहे. पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांना दोन्ही गुन्ह्यातील गुन्हेगार हा चोपडा तालुक्यातील सुटकार येथे असल्याची गोपनिय माहिती मिळाली.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गिरासे, स.फौ. विजय पाटील, अशोक महाजन, सुरज पाटील, दिनेश बडगुजर, नरेंद्र वारूळे, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, महेश महाजन यांना रवाना केले. पथकाने सुटकार गावात सापळा रचून संशयित आरोपी प्रदीप लोटन कोळी (वय-२७) याला अटक केली. चोरीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल आणि मोबाईल हस्तगत केला आहे. पुढील कारवाईसाठी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.