जळगाव – राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) जळगाव अंतर्गत स्वछ भारत मिशन अतंर्गत स्वच्छता व साक्षरता अभियानातंर्गत मंगरुळ (ता. अमळनेर) गावात बचत गटातील महिला व नागरीकांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाप्रसंगी नाबार्ड बँकेचे जळगाव जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत झाबंरे, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, जळगाव पीपल बँकेच्या व्यवस्थापक श्रीमती दप्तरी, यशदाचे ट्रेनर भटू पाटील, जिल्हा समन्वयक नितीन नेरकर, प्रा. संदीप पाटील, ग्रामपंचायत सदस्य विश्वास पाटील, किशोर पाटील, सोसायटीचे सचिव अमोल पाटील, आनंदा पाटील, व्ही टी पाटील, कृषी सखी सुनंदा पाटील, रेखा घोलप, धनश्री पाटील, कविता पाटील, गावातील बचत गटाच्या महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी नाबार्डच्या मध्यमातून विनोद ढगे व त्यांच्या सहकार्यांनी पथनाट्याद्वारे स्वच्छता, आरोग्य, साक्षरता, व्यसनमुक्ती व बेरोजगारी यावर पथनाट्य सादर केले. गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी कोरोनाबाबत घ्यावायची काळजी, स्वछता, वृक्षारोपण, शौचालयाचा वापर व नरेगा संदर्भात मार्गदर्शन केले. नाबार्डचे व्यवस्थापक श्री. झांबरे यांनी स्वछता व साक्षरता आणि बचतगटांना उद्योगासाठी कर्जपुरवठा व रोजगार याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी गावातील बचत गटातील महिला, नागरिकांनी कोरोनाबाबत जनजागृती, स्वछता, साक्षरता याबाबत शपथ घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल पाटील यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. संदीप पाटील यांनी मानले.