नवी दिल्ली : 2021 मध्ये ओपेक देशांचे लक्ष्य काय असेल हे ठरविण्यासाठी 30 नोव्हेंबर, 1 डिसेंबरला बैठक होणार आहे. या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाचे दर 40 वरून 45 डॉलरवर पोहोचले आहेत. याचाच परिणाम गेल्या आठवडाभरापासून पहायला मिळाला असून देशातील पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढू लागल्या आहेत.पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत आठवडाभरात मोठी वाढ.
गेल्या 48 दिवसांपासून देशातील पेट्रोल, डिझेलच्या किंमती स्थिर होत्या. मात्र, गेल्या पाच दिवसांपासून या किंमती सतत वाढू लागल्या आहेत. सरकारी पेट्रोलिअम कंपन्यांनी आज पेट्रोल सहा पैशांनी वाढविले आहे. तर डिझेल 17 पैशांनी वाढले आहे. मुंबईत आज पेट्रोल 88.52 रुपये प्रति लीटर, तर डिझेल 77.33 रुपयांवर गेले आहे.
सप्टेंबरपासून किंमती वाढविण्याचे बंद करण्यात आले होते. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती या 20 डॉलरवर आल्या होत्या. दीड महिन्यांपूर्वी इंधनाच्या दरात 1.19 रुपयांची घट झाली होती. यानंतर 48 दिवसांपर्यंत किंमती स्थिर ठेवण्यात आल्या होत्या. या किंमती गेल्या आठवड्यालपासून पुन्हा वाढू लागल्या आहेत. गेल्या पाच दिवसांत पेट्रोल 53 पैशांमी महाग झाले आहे. तर डिझेलच्या किंमतीमध्ये 95 पैशांची वाढ झाली आहे.
निवडणुकीनंतर इंधन दरवाढ करण्याचे कोणतेही वैध कारण नाही. इंधन दरवाढीमुळे इतर वस्तूंच्या किमतीवर परिणाम होतो. त्याचा फटका सामान्य व्यक्तीला बसतो. केंद्र सरकारने इंधन दरवाढ थांबवावी. याबाबत पंतप्रधान, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री, रस्ते वाहतूक मंत्रालय यांना पत्र पाठवल आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल वाढताच गुरुवारी मध्यरात्रीनंतर कंपन्यांनी इंधनाच्या किमती वाढविल्या. शुक्रवार, २० नोव्हेंबरला पेेट्रोल प्रति लिटर ८८.४५, डिझेल ७७.६७ रुपये विकल्या गेले. पूर्वीच्या आकडेवारीनुसार १९ सप्टेंबरला पेट्रोलचे दर ८८.३७ रुपये होते. तर २१ सप्टेंबरला ८ पैशांची घसरण होऊन ८८.२९ रुपयांवर स्थिरावले. त्यानंतर २० नोव्हेंबरला पेट्रोल १६ पैशांनी तर डिझेल २३ पैशांनी वाढले आहे.
पेट्रोल आणि डिझेल दर
तारीख पेट्रोल डिझेल
१९ सप्टें. ८८.३७ ७८.६२
२१ सप्टें. ८८.२९ ७८.३३
२७ सप्टें. ८८.२९ ७७.७२
२८ सप्टें. ८८.२९ ७७.६४
१३ ऑक्टो. ८८.२९ ७७.४४
२० नाेव्हें. ८८.४५ ७७.६७
अजून वाचा
आजपासून पेट्रोल – डिझेलच्या दरात मोठी वाढ, नवीन दर जाणून घ्या