Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागासाठी 30 नोव्हेंबर अंतिम मुदत

360 रुपयात 24 हजार रुपयांचे विमा संरक्षण

by Divya Jalgaon Team
November 23, 2020
in जळगाव
0
प्रधानमंत्री पीक विमा

जळगाव – नैसर्गिक आपत्ती, किड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतक-यांना विमा संरक्षण देणे, पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही  शेतक-यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे. ही उद्दिष्ट्ये समोर ठेवून रब्बी हंगाम 2020-21 मध्ये जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरुन राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

या योजनेत सहभागासाठी रब्बी ज्वारीकरीता 30 नोव्हेंबर, 2020 ही अंतिम तारीख आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदवावा. असे आवाहन संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी केले आहे.

पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतक-यांना ऐच्छिक आहे, नुकसान भरपाई कृषि आयुक्तालयामार्फत पीक उत्पादनाच्या अंदाजासाठी घेतलेल्या पीक कापणी प्रयोगाच्या उत्पादकतेच्या सरासरी आकडेवारीवर आधारित असेल, जोखीमस्तर सर्व पिकांसाठी 70 टक्के असा निश्चित करण्यात आला आहे.

या योजनेत सहभागासाठी रब्बी ज्वारी 30 नोव्हेंबर, गहु बागायती, हरभरा व रब्बी कांदासाठी 15 डिसेंबर, 2020, उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूगसाठी 31 मार्च, 2021 ही सहभागाची अंतिम तारीख आहे. कर्जदार शेतकरी यांनी योजनेत सहभागी न होण्याची व विमा हप्ता कर्ज रक्कमेतुन वजावट करुन विमा कंपनीकडे वर्ग न करण्याची सूचना बँकेला देण्याची अंतिम मुदत ही नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या 7 दिवस आधीपर्यंत आहे.

जिल्ह्यात रब्बी हंगाम 2020-21 मध्ये सदरची योजना भारती ॲक्सा जनरल इंन्शुरन्स कंपनी लि. मिलेनियम स्टार 309, 310, 111 बिल्डींग, ढोले पाटील मार्ग, रुबी हॉल क्लिनिकजवळ, पुणे, महाराष्ट्र-411 001 टोल फ्री क्र – 1800 103 7712 यांचेमार्फत राबविण्यात येत आहे.

रब्बी हंगाम 2020-21 अंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांसाठी कर्जदार व बिगर कर्जदार शेतक-यांनी सहभागी होण्यासाठी जवळच्या बँकेत, आपले सरकार सेवा केंद्र, जे. डी. सी. सी. बँक यांचेशी संपर्क करुन सहभाग नोंदवावा. अथवा www.pmfby.gov.in या संकेतस्थळावर स्वत: सहभाग नोंदविण्याची सुविधा आहे. कर्जदार शेतक-यांचा हप्ता संबंधित बँकेव्दारे भरला जाऊन सहभाग नोंदविला जातो.

अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्यातील नजीकच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा, सर्व राष्ट्रीयकृत बँक, आपले सरकार सेवा केंद्र, तालुका कृषि अधिकारी कार्यालय (सर्व तालुके), उपविभागीय कृषि अधिकारी, जळगाव/पाचोरा/अमळनेर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव, आकाशवाणी शेजारी, शासकीय इमारत येथे संपर्क साधावा. असे आवाहन श्री. ठाकुर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Share post
Tags: 30 NovemberJalgaon Latest Newsjalgaon marathi newwsJalgaon newsLast DatePik Vima Yojanawww.pmfby.gov.inप्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागासाठी 30 नोव्हेंबर अंतिम मुदत
Previous Post

फरार असलेल्या आरोपींना भुसावळ बाजार पेठ पोलीसांनी केले जेरबंद

Next Post

जिल्ह्यात आज २४ तासांमध्ये ६५ नवीन कोरोनाबाधीत रुग्ण

Next Post
जिल्ह्यात आज १०६३ रूग्ण कोरोनाबाधित आढळले, २१ जणांचा मृत्यू

जिल्ह्यात आज २४ तासांमध्ये ६५ नवीन कोरोनाबाधीत रुग्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group