भुसावळ प्रतिनिधी । शहरातील सिंधी कॉलनी येथील रिक्षाचालकाला चाकूचा धाक दाखवत खिश्यातील रोक रक्कम जबरी हिसकावून फरार असलेल्या दोन्ही आरोपींना भुसावळ बाजार पेठ पोलीसांनी केले जेरबंद .
दोघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अनिल हनुमानसिंग ठाकुर वय-57 रा. सिंधी काॅलनी भुसावळ हे रिक्षा चे सिट कव्हर ची मजुरी पैसे देण्यासाठी जात असतांना जामनेर रोड दिनदयाल नगर मधील गिरीष किराणा दुकान च्या बाजु च्या बोळीत जात असतांना संशयित आरोपी अशोक उर्फ भाचा सदाशिव कोळी रा.दिनदयाल नगर भुसावळ ,
अजावेद उर्फ पोटली नवाब बागवान रा.पंचशील नगर आणि एक अनोळखी व्यक्ती यांनी चाकूचा धाक दाखवत रिक्षा चालकाच्या खिश्यातील ४ हजार ९०० रूपये जबरी हिसकावून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात तीन जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांनी दोघांना पंचशिल नगरातून अटक केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, प्रभारी पोलीस निरीक्षक बाबा ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि कृष्णा भोये, पो.ना.किशोर महाजन, रमण सुरळकर , रविंद्र बिर्हाडे, उमाकांत पाटील, पो.काॅ.विकास सातदिवे ईश्वर भालेराव ,प्रशांत परदेशी,रविंद्र तायडे, कृष्णा देशमुख,सचिन चौधरी,चेतन ढाकणे,सुभाष साबळे अशानी केली असुन पुढील तपास सपोनि कृष्णा भोये आणि पो.कॉ. रविंद्र तायडे करीत आहे.