जळगाव – डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणेमार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकरीता स्पर्धा परीक्षेच्या पूर्वतयारीबाबत व प्रशिक्षणाकरिता दरवर्षी मार्गदर्शन व आर्थिक सहाय्य देण्यात येते. संघ लोकसेवा आयोगातर्फे नागरी सेवा पूर्व परीक्षा दिनांक 4 ऑक्टोबर, 2020 रोजी घेण्यात आली असून या परीक्षेचा निकाल दिनांक 23 ऑक्टोबर, 2020 रोजी संघ लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात आला आहे.
सन 2020 मध्ये अनुसूचित जातीचे विद्यार्थी संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा पूर्वपरीक्षा 2020 मध्ये उत्तीर्ण झाले आहेत व बार्टीचे पात्रेतेचे निकष पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेकरिता एकावेळी एकरकमी 50 हजार आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहेत.
बार्टीमार्फत मुख्य परीक्षेकरिता देण्यात येणाऱ्या आर्थिक सहाय्यासाठी जे विद्यार्थी पात्र आहेत, त्यांनी बार्टीच्या संकेतस्थळाला भेट देऊन पात्रतेचे स्वरूप तपासून अर्ज डाउनलोड करून व अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून मेलवर दिनांक 8 डिसेंबर, 2020 रोजी सायंकाळी 5.30 मिनिटांपर्यंत अर्ज पाठविण्यात यावा. असे आवाहन धम्मज्योती गजभिये, महासंचालक, बार्टी, पुणे यांनी केले आहे.