जळगाव – येथील केसीई अभियांत्रिकी महाविद्यालयात दि.७ नोव्हेंबर रोजी औरंगाबाद ऑटो अँसिल्लारी लिमिटेड तसेच श्री गणेश प्रेमसिंग्स अँड कॉटस इंडिया प्रा. लिमिटेड ह्या नामांकित कंपन्यांनी कॅम्पस ड्राईव्ह आयोजित केला होता.
त्यात तब्बल ७१ विद्यार्थी व विद्यार्थिनीची ग्रॅजुएट इंजिनिअर ट्रेनी आणि डिप्लोमा ट्रेनी म्हणून निवड झाली आहे.
हे विद्यार्थी बीटेक , बी व्होक आणि डिप्लोमाचे आहेत. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ के पी राणे , कॅम्पस डायरेक्टर डॉ एस आर सुगंधी, अकॅडेमिक डायरेक्टर प्रा एस ओ दहाड तसेच डीकेएसडीचे प्रा एस पी पावडे आदींनी कौतुक करून पुढील उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या. कॅम्पस ड्राईव्ह च्या यशस्वी आयोजनासाठी टीपीओ प्रा महेंद्र पवार, सर्व विभागप्रमुख, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वृंद आणि टी अँड पी विभाग यांनी परिश्रम घेतले.