जळगाव । जळगाव जिल्ह्यातील शिक्षकांच्या कोविड चाचण्या सुरूच राहणार. जिल्ह्यात ७ डिसेंबरपर्यत शाळा सुरू न करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला असला तरी मात्र यानंतरही शिक्षकांच्या तपासण्या सुरूच राहणार असून, असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी बी.जे. पाटील यांनी केले आहे. सोमवारी नववी ते बारावीच्या शाळा सुरू होणार असल्याचे नियोजन करण्यात आले होते.
याआधी शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्यास प्रारंभ झाला होता. रविवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यात शिक्षकांच्या ८ हजाराहून अधिक चाचण्या पूर्ण झाल्या आहेत, आता केवळ साडेचार हजारांपर्यंत चाचण्या अपूर्ण आहेत.
या चाचण्यांमध्ये २० शिक्षक कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. यात १० शिक्षकेतर कर्मचारी आहेत. दरम्यान, रविवारी सायंकाळी स्थानिक प्रशासनाकडून शाळा सुरू न करण्याचे निर्देश देण्यात आले असले तरी, शिक्षकांनी ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवण्याचे निर्देश शिक्षकांना देण्यात आले आहे. तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांच्या कोरोना चाचण्या देखील कायम राहणार आहेत.