जळगाव प्रतिनिधी । महात्मा फुले समता परिषद जिल्हाध्यक्षपदी सचिन चौधरी. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी भुसावळ येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन संतोष चौधरी यांची निवड करण्यात आली आहे.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदचे संस्थापक छगन भुजबळ यांच्या आदेशाने, अखिल भारतीय समता परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी भुसावळ येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन संतोष चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक, समन्वयक अनिल नाडे, जळगाव जिल्हा पश्चिमचे जिल्हाध्यक्ष सतीश महाजन, कार्याध्यक्ष वसंत माळी, उत्तर महाराष्ट्र निरीक्षक शालिग्राम मालकर, माजी आमदार हरिभाऊ महाजन, बारा बलुतेदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विवेक ठाकरे, मुकुंद सपकाळे, प्रकाश महाजन, जिल्हा उपाध्यक्ष संतोष माळी, नगरसेविका सरिता नेरकर आदी उपस्थित होते. सचिन चौधरी यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे परिसरातून कौतुक होत आहे.