जळगाव :- जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या आदेशान्वये जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रानुसार जळगाव तालुका संजय गांधी निराधार योजना समिती गठीत करण्यात आलेली आहे.
समितीच्या अध्यक्षपदी रमेश जगन्नाथ पाटील – जळके , सदस्य पदी प्रमोद रतन राव सोनवणे- भोकर, श्रीमती सविता विनायक चव्हाण – डिकसाई, सुरेश बाबुराव गोलांडे- विटनेर, मनोज दिगंबर चौधरी – आवार , ललित हरि साठे- विटनेर, भागवत श्रावण पाटील -चिंचोली, सचिन वसंत चौधरी -आसोदा, अविनाश विजय पाटील – धानवड, चंद्रकांत भागवत भोळे – नाशिराबाद यांची समिती सदस्य निवड करण्यात आलेली आहे. या सर्व सदस्यांचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर सदस्यांनी ना.गुलाबराव पाटील यांचे आभार मानले.