Friday, April 3, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

गजानन मालपुरेंनी केली जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

जिल्हा रुग्णालयात मशिनरी खरेदीत अपहार

by Divya Jalgaon Team
November 21, 2020
in जळगाव, राजकीय
0
गजानन मालपुरेंनी केली जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

जळगाव – जळगाव जिल्हा रुग्णालयात मेमोग्राफी मशीन व फेको मशीनसह इतर मशिनरी खरेदी करताना मोठ्या प्रमाणात अपहार झाला आहे.

यासंदर्भात सिव्हील सर्जन यांच्यावर फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात यावी, अशा आशयाची तक्रार शिवसेनेचे गजानन मालपुरे यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे केली आहे. विशेष म्हणजे संबंधीचे सर्व पुरावे देण्यास तयार असल्याचे देखील तक्रारी अर्जात मालपुरे यांनी नमूद केले आहे.

जळगाव जिल्हा रुग्णालयात मॅमोग्राफी मशीन, फेको मशीनसह इतर मशिनरी खरेदी करताना मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचे दिसून येत आहे. सदर मशनरी एकाच व्यावसायिकाकडून खरेदी करण्यात आलेल्या आहेत.

सदर मशनरीची बिले घेताना बिलांमध्ये मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे नाव सारख्या अत्यावश्यक गोष्टी देखील नमूद केलेल्या नाहीत. त्यामुळे आम्ही ऑनलाईन मशीनच्या किंमती  बघितले असता जिल्हा ग्रामीण रुग्णालय आणि घेतलेल्या मशनरीच्या किंमती व ऑनलाइन असलेल्या किंमतीमध्ये प्रचंड तफावत दिसून येत आहे. तरी सदरचे सिव्हील सर्जन नागोजी चव्हाण यांनी खरेदी केलेल्या मशिनरीच्या किमतींमध्ये तफावत असल्यामुळे त्यात मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचे दिसते.

सदर प्रकरणाची तज्ञ लोकांची समिती नेमून मशिनरी खरेदीसाठी व इतर रुग्णांसाठी अत्यावश्यक सर्व बाबींची चौकशी करण्यात यावी. तालुक्याच्या ठिकाणी मशिनरी खरेदी करून दोन-तीन वर्ष होऊन देखील त्या हाताळणाऱ्या तज्ञ व्यक्ती डॉक्टर उपलब्ध नसताना सदरच्या मशिनरी खरेदी करून शासनाच्या पैशांचा अपव्यय केल्याचे दिसते.

सिव्हील सर्जनसह दोषी व्यक्तींवर फौजदारी व शासकीय नियमानुसार कारवाई करण्यात यावी. याबाबतचे सविस्तर पुरावे योग्य ते पुरावे देण्यास आम्ही तयार आहोत असे देखील मालपुरे यांनी या तक्रारी अर्जात नमूद केले आहे. दरम्यान, या तक्रारी अर्जाच्या प्रत राज्यपालांसह मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांना देखील रवाना करण्यात आलेल्या आहेत.

Share post
Tags: #Gajanan MalpureDivya Jalgaon NewsJalgaonJalgaon Latest NewsMarathi Newsगजानन मालपुरेंनी केली जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
Previous Post

वरणगावातील राजमल ज्वेलर्स फोडणाऱ्या दोन संशयित आरोपींना अटक

Next Post

जिल्ह्यातील सात तालुके निरंक; ५९ रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह

Next Post
नायब तहसीलदारांसह दोन लिपीक कोरोनाबाधीत आढळले

जिल्ह्यातील सात तालुके निरंक; ५९ रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group