चोपडा (प्रतिनिधी) : येथील अमर संस्था संचलित बालमोहन प्राथमिक विद्यालयाच्या उपक्रमशील उपशिक्षिका रोहिणी भास्करराव कापडणे-शिंदे यांना जळगाव येथील राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेतर्फे दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण होणार असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा संदीपा वाघ यांनी दिली आहे.
उत्तम अध्यापन, अध्यापनातील नाविन्यपूर्ण उपक्रम, विज्ञान प्रदर्शने, स्नेहसंमेलने व केंद्रानिहाय शिक्षण परिषद यातील यशस्वी सहभाग तसेच विद्यार्थी हितासाठीची त्यांची तळमळ लक्षात घेऊन संस्थेने या पुरस्कारासाठी त्यांची निवड केली आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल जळगाव येथील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते सुमित पाटील (अध्यक्ष, गौरी प्रकल्प), अमर संस्था चोपडा चे चेअरमन चंद्रकांत पाटील, उपाध्यक्ष मनोज चित्रकथी, सचिव दिपक जोशी, व्यवस्थापक मुकेश चौधरी, प्राथमिक चे मुख्याध्यापक प्रदीप चौधरी, माध्यमिक मुख्याध्यापिका रेखा पाटील तसेच राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कारप्राप्त जानवे (ह मु चोपडा) येथील सामाजिक कार्यकर्ते बी एन पाटील, चुंचाळे येथील डॉ प्रतापराव शिंदे, चोपडा साखर कारखान्याचे माजी संचालक जितेंद्र पाटील, प्रगतशील शेतकरी विजय पाटील, चोपडा नगर परिषदेतील विरोधी पक्ष गटनेते महेश पवार, ग्रामसेवक दीपक म.भामरे,प्रा. पंकज प्र.शिंदे, तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर व हितचिंतकांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. रोहिणी कापडणे-शिंदे या चोपडा येथील प्रताप विद्या मंदिराचे चे उपशिक्षक पंकज शिंदे यांच्या पत्नी होत.