जळगाव प्रतिनिधी । शहरातील मोहाडी रोड परिसरातील एका ६० वर्षीय व्यापाऱ्याला जुन्या वादातून गुरूवारी रात्री महिलेसह अज्ञात तीन व्यक्तींनी शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी चार जणांविरोधात रामानंदनगर पोलीस स्थानकात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
व्यापारी रमेश छारुमल तिंडवाणी वय 60 रा. रविंद्र नगर यांनी पायल सोनवणे यांच्यासह इतरांविरोधात पोलिसात केसेस केलेल्या आहेत. या केसेस मागे घ्याव्यात तडतोड करावी म्हणून 19 रोजी पायल सोनवणे हिच्यास तीन व्यक्तींनी रमेश तिंडवाणी यांना मोहाडी रस्त्यावरुन जात असतांना शिवीगाळ करुन चापटा बुक्क्यांनी मारहाण केली.
तसेच धमकी दिली. अशी तक्रार तिंडवाणी यांनी शुक्रवारी 20 नोव्हेंबर रोजी रामानंदनगर पोलिसात तक्रार दिली आहे. त्यावरुन पायल सोनवणे हिच्यासह तीन अज्ञात व्यक्तींविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान घटनेची तक्रार देण्यासाठी घटनास्थळ हे एमआयडीसी हद्दीत असल्याने तिंडवाणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गेले होते. मात्र येथील कर्मचार्यांनी त्यांना रामानंदनगर पोलीस ठाण्यात जाण्यास सांगितले. रामानंदनगर पोलीस ठाण्याचे कर्मचार्यांनी खर्या पोलिसिंगचे दर्शन घडवित, घटनास्थळ एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असतांनाही तक्रार नोंदवून घेतली.