जळगाव – शहरातील रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालय आणि राजीव गांधी नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ बौद्धिक संपदा प्रबंधन संस्थान भारत सरकार नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने बौद्धिक संपदा विकास व पेंटट प्रक्रिया या विषयावर एकदिवसीय ऑनलाईन परिसंवाद संपन्न झाला.
या परिसंवादाचे उद्घाटन डॉ. पंकज बोरकर ( डेप्युटी कंट्रोलर राजीव गांधी नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ बौद्धिक संपदा प्रबंधन संस्थान नागपूर) यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी डॉ. पंकज बोरकर यांचे उत्तर महाराष्ट्रातील पहिलेच असलेल्या व्याख्यानात प्रोग्राम पेटंट, पेटंट प्रोसेस, कॉपीराईट , भौगोलिक संकेत यांचे सखोल मार्गदर्शन केले. या ऑनलाईन कार्यक्रमात जगातील ७ देशांच्या प्रतिनिधींनी व भारतातील शास्त्रज्ञ तसेच विविध महाविद्यालयातील प्राध्यापक व औद्योगिक क्षेत्रातील ४३२ व्यक्तींनी सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमाचे समन्वय प्रा. प्रतिभा चिखले, प्रा. हेमंत चौधरी व प्रा. योगिता पाटील यांनी केले तसेच या कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इंस्टिट्यूटचे संचालक श्री. प्रितम रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व प्राचार्य डॉ. ए. जी. मॅथ्यू यांनी अभिनंदन केले.