भुसावळ- उत्तर प्रदेश मधील भदोली गावातील रहिवासी असलेली महिला सुरतमध्ये आपल्या पती व मुलांसोबत राहत असून कुणालाही न सांगता ट्रेनने दुपारी भुसावळ रेल्वे प्लॅटफॉर्मवर आली. तीला टीसी स्टॉफने तिकीट विचारले असता तिकीट नसल्याने महिलेस टिसी लॉबी मध्ये बसविले. महिलेस विचारणा केली असता ती पळून आल्याची सत्यता समोर आली. टी.सी स्टॉफ सतर्कतेमुळे महिला लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले.
उत्तर प्रदेशातील भदोली जिल्ह्यातील खुशबु योगेश सिंग (वय २० ह.मु.कैलास चौकी, ईश्वर नगर,सुरत) मध्ये राहत असून पती सोबत भांडण करून कुणालाही न सांगता रागाच्या भरात घरून निघून ट्रेनने भुसावळ रेल्वे स्थानकावर आली. प्लॅटफॉर्म वर उतरली असता टीसी स्टॉफने तिकीट विचारणा केली असता तिकीट नसल्याने महिलेस टिसी लॉबीमध्ये बसविले.
महिला टीसी यांनी महिलेची विचारणा केली असता ती महिला घरून पळून आल्याची सत्यता समोर आली. याबाबत टीसी स्टॉफने एस.सी.एम.ए.के.पाठक यांना सविस्तर माहिती दिली असता यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे सुरक्षा बल कार्यालयात मेमो देण्यास सांगितले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली टीसी स्टॉफ ने मेमो तयार करून रेल्वे सुरक्षा बलच्या सब इनस्पेक्टर दीपा सिंग यांनी भेट घेतली असता त्यांनी मेमो घेण्यास नकार दिला व तुमच्याकडून जे होईल ते करा मी मेमो घेणार नाही असे उर्मट भाषेत धिक्कार दिला.
या बाबत एस.सी.एम.ए.के.पाठक यांना कळविले असता त्यांनी कंट्रोल यांना सूचना देऊन सर्व माहिती दिल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच टीसी स्टॉफला लोहमार्ग पोलीस स्टेशनच्या नावाने मेमो बनविण्याचे आदेश दिले. त्यानुसार टीसी स्टॉफ लॉबीचे इंचार्ज शेख गोठले, नवनीत तिवारी, दीपाली बोबडे, मोहम्मद अकिल, एम. डी. फिरके, आयटीसीएओ सचिव निसार खान अशांनी रेल्वे सुरक्षा बलच्या दीपा सिंग व दोन कर्मचारी सोबत घेऊन महिलेस लोहमार्ग पोलीस स्टेशनच्या स्वाधीन केले.
खुशबू सिंग ही महिला कुठलीही माहिती परिवाराला न सांगता सुरत वरून घरातून पती सोबत भाडंण करून पळून आलेली होती. शेवटी भुसावळ टीसी स्टॉफच्या सतर्कतेमुळे सुरक्षितेत टीसी स्टॉफ लॉबीने मिळून लोहमार्ग पोलीस स्टेशनच्या निरीक्षकांच्या स्वाधीन केले. निरीक्षकांनी सुरतला महिलेच्या परिवारास संपर्क साधला असता महिलेचे पती लवकरच भुसावळ स्टेशन गाठून महिलेस ताब्यात घेणार असल्याची माहिती टीसी स्टॉफने दिली.