मुंबई – राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांना कोरोनाची लागण झाल्याची चर्चा गुरुवार सायंकाळपासून सुरु झाली होती. त्यामुळे ते उपचारासाठी मुंबई येथील बॉम्बे रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र त्यांचा कोरोना रिपोर्ट नेगेटिव्ह आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.
एकनाथराव खडसे यांचे मुंबईत आल्यानंतर दोन्हीही रिपोर्ट नेगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज सकाळी १० वाजता त्यांना रुटीन चेकअपसाठी बोलावण्यात आले असल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे.
यावेळी एकनाथराव खडसे यांनी आवाहन केले होते की, ‘मला कोरोनाची लागण झाली असून माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि कोरोनाची चाचणी करावी. तसेच मी बरा होईपर्यंत भेटण्यास येऊ नये. तसेच आज त्यांचे रिपोर्ट नेगेटिव्ह आल्याने त्यांना सध्या घरीच विश्राम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.