जळगाव – १९ नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय पुरुष दिन जगभरात कुटुंब आणि समुदाय यांच्यात सकारात्मक मूल्यांनी साजरा केला जातो. म्हणून सकारात्मक भूमिका नमूद करण्यासाठी आणि पुरुषांच्या कल्याणाविषयी जागृत वाढविण्यासाठी आम्ही ” Better health for men and boys” ही थीम ठेवली आहे.
सर्वप्रथम १९ नोव्हेंबर १९९९ मध्ये डॉ. जेरोम तेलक्सिंग यांनी टोबॅगोला पुरुष दिनाचे आंतरराष्ट्रीय आकर्षण मिळवून दिले. नवीन कार्यक्रमास कॅरेबियनमध्ये प्रचंड पाठिंबा मिळाला आणि सतत इतर नेटवर्किंगद्वारे आणि इतर देशातील व्यक्तींना पाठवलेल्या निमंत्रणामुळे पुरुष आंतरराष्ट्रीय स्तरावर रुजला.
कॅरेबियन उपक्रम आता स्वतंत्रपणे सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, भारत, युनायटेड किंग्डम, युनायटेड स्टेटस, दक्षिण आफ्रिका, हैती, जमैका, हंगेरी, माल्टा, घाना, मोल्डोव्हा, कॅनडासारख्या विविध देशांमध्ये साजरा केला जात आहे आहे. आणि या कार्यक्रमाचे आवड वेगाने वाढत आहे. आयएमडी जगातील ८० पेक्षा अधिक देशांमध्ये साजरा केला जातो.
आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या सहा स्तंभामध्ये पुरुषांमधील सकारात्मकता रोल मॉडेलला प्रोत्साहन देणे, पुरुषांच्या सकारात्मक योगदानाचा आनंद साजरा करणे, पुरुषांच्या आरोग्यावर आणि स्वास्थ्यावर लक्ष केंद्रित करणे, पुरुषांवरील भेदभाव अधोरेखित करणे, लिंग संबंध आणि लिंग समानता सुधारणे, एक सुरक्षित आणि चांगले जग निर्माण करणे, यांचा समावेश केला आहे.
एमआयडीचे भारत समन्वयक तारीख शेख, जळगाव महाराष्ट्र यांनी या मागण्या केल्या आहेत. तसेच त्यांच्या हस्ते कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी पार पाडल्याबद्दल डॉ. निलेश पाटील, डॉ. निरंजन देशमुख, डॉ. सुमित निंबाळकर, डॉ. विनोद खैरनार, प्रितेश मसाने, जगदीश राठोड, चारुदत्त पाटील आदींना हेल्थकेअर वर्कर यांना ” Men Leading by Example” या पुरस्काराने गौरवण्यात आले.