जळगाव :- वडोदा वनक्षेत्रा कडील नियतक्षेत्र राहुरा कं.नं. 565 मध्ये अज्ञात इसमाने रात्रीअपरात्री राखीव वनात अपप्रवेश करुन अवैध वृक्षतोड केली होती. सदर घटणे बाबत वनरक्षक राजुरा यांचे कडील प्र.गु.रि. 04 /2020 दिनांक 6 नोव्हेंबर,2020 जारी करुन भारतीय वन अधिनियम 1927 व कलम 26 (1) अ.ङ फ. ह. अन्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर वनगुन्हयाचा अधिक तपास केला असता गुन्हयातील फरार आरोपी सुभाष भावसिंग पावरा उ.व. 37 व नानभाउ राजमला पावरा उ.व. 36 दोघे राहणार धुळे ( पावरी वाडा) सध्या मुक्ताईनगर जि. जळगाव यांना चौकशी साठी ताब्यात घेवून अटक करण्यात आली.
दिनांक 18 नोव्हेंबर,2020 रोजी विवेक वि. होशिंग उपवनसंरक्षक प्रा. जळगाव राजेंद्र ग.राणे वनपरिक्षेत्र अधिकारी अतिक्रमण व निर्मुलन भुसावळ स्थित जळगाव तसेच आशुतोष रा. बच्छाव वनपरिक्षेत्र अधिकारी वडोदा (अति. कार्यभार) यांनी घटणास्थळी भेट देवुन झालेल्या अवैध वृक्ष तोडीची जागेवर जावुन पाहणी केली असता वरील प्रमाणे दोघे आरोपी यांना ताब्यात घेतले सदर आरोपी वनक्षेत्र वडोदा अतर्गत वनकस्टडी येथे चौकशी कामी घेण्यात आले त्यांची वैदयकीय तपासणी करुन त्यांना दिनांक 19 नोव्हेंबर,2020 रोजी मे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मुक्ताईनगर यांचे न्यायालयात हजर करण्यात आले.
सदरची कार्यवाही दिगंगर वा. पगार, वनसंरक्षक प्रा. धुळे विवेक वि. होशिंग उपवनसरंरक्षक प्रा. जळगाव उमेश वावरे विभागीय वनअधिकारी दक्षता धुळे, राजेंद्र ग. राणे वनपरिक्षेत्र अधिकारी अतिक्रमण व निर्मुलन भुसावळ स्थित जळगाव आशुतोष र. बच्छाव वनपरिक्षेत्र अधिकारी वडोदा, भावना र. मराठे वनपाल कुऱ्हा, डीगंबर गो.पाचपांडे वनपाल चारठाणा, विजय सु. अहीरे वनरक्षक राजुरा, डी. एस. पवार वनरक्षक वायला यांच्या मदतीने ही कार्यवाही करण्यात आली. सदर वनगुन्हया प्रकरणी पुढील तपास भावना र. मराठे वनपाल कुऱ्हा करीत आहे. असे वनपरिक्षेत्र अधिकारी वडोदा यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.