पाळधी ता. धरणगाव- राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी वणी येथील सप्तश्रुंगी माता आणि शिर्डी येथील साईबाबांचे दर्शन घेऊन राज्यावरील कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी साकडे घातले.
ना. गुलाबराव पाटील यांनी काल दुपारी वणी येथील सप्तश्रुंगी देवीचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी आज श्री साईबाबांच्या समाधी मंदिरात दर्शन घेतले. कोरोनाचे संकट टळू देण्यासाठी श्री साईबाबांना साकडे घातले आहे.
राज्य सरकार आणि त्यासोबत जळगाव जिल्हा प्रशासनाच्या मदतीने कोरोना आटोक्यात येत असला तरी दुसर्या लाटेचे संकट अजून कायम आहे. म्हणून कोरोनाचे संकट दूर सारावे अशी प्रार्थना ना. गुलाबराव पाटील यांनी या दोन्ही देवस्थानांवर करून त्यांना साकडे घातले.