जळगाव ;- केंद्रात आणि शहरात भाजपाची सत्ता असतानाही जळगाव शहराचा विकास खुंटला असून ठिकठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडले असून नागरिकांना चालणेही मुश्किल झाले आहे . तसेच गटारी , कचराकुंड्या तुंबल्या असून यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे .
राष्ट्रवादीचे सक्रिय कायकर्ता आणि साहिल फाउंडेशन
त्यामुळे राष्ट्रवादीचे सक्रिय कायकर्ता आणि साहिल फाउंडेशनचे अध्यक्ष साहिल पटेल यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड , महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध प्रभागांमध्ये नागरिकांच्या समस्या , प्रश्न सोडविण्यासाठी ‘जनता दरबार ‘ चे आयोजन दर रविवारी सकाळी १० ते १२ यावेळेत करण्यात आले आहे . याचा नागरिकांना लाभ होत आहे.
याशिवाय साहिल पटेल हे स्वखर्चाने प्रभागातील कामे करीत असून संबंधित प्रभागातील नगरसेवक आणि मनपा अधिकारी यांच्याशी चर्चा करून समस्यांचे निवारण करीत आहे . नुकतेच प्रभाग क्रमांक १९ आणि २० मध्ये नागिरकांकडून फोनद्वारे नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होत असून ‘ऑन दि स्पॉट ‘ या तत्वानुसार जागेवरच समस्या मार्गी लावल्या जात आहे . जळगाव मनपाला कोट्यवधींचा निधी प्राप्त झाला असतानाही विकासकामे खुंटली असून नागरिकांच्या मूलभूत सोया सुविधा पूर्ण न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा साहिल पटेल यांनी दिला आहे .
यांचे मिळत आहे सहकार्य
अल्तमश खान,इजाज खान, नबील शेख, नदीम शेख, जाहिद शहा , प्रदीप पाटील, इम्रान साहिल, अमन खान, रिझवान शेख , पंकज नाले आदींचा सहभाग लाभत आहे.
नागरिकांनी आपल्या प्रभागात काही समस्या स्टील तर ७९७२८९९७०० या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन साहिल फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.