जळगाव (प्रतिनिधी) – येथील काँग्रेस भवन समोरील वासुपूज्य जैन मंदिरात सुमीरा गांधी परिवारतर्फे सोमवार दि. २३ नोव्हेंबर रोजी द्वार उदघाटन करण्यात आले. यावेळी कोरोनाचे संकट लवकर निवारण होऊ दे यासह विश्वशांतीसाठी परमेश्वराकडे प्रार्थना करण्यात आली.
सुमीरा गांधी परिवारतर्फे नवीपेठेतील निवासस्थान येथून पूजेचे साहित्य घेऊन मंदिरात आले. तेथे परमेश्वराच्या घोषणा देण्यात आल्या. देवाचे नामस्मरण करून नवकार मंत्राचा पाठ करण्यात आला. यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यांचे द्वार उदघाटन संजय, अजय, रिकेश, पियुष,आयुष यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी पुन्हा देवाचे नामस्मरण करण्यात आले. चैत्यवंदन झाले.
यावेळी परमेश्वराला, कोरोनाचे संकट देशातून लवकर जाऊ दे, तसेच विश्वशांती कायम राहावी यासाठी प्रार्थना करण्यात आली. गुरु महाराजांतर्फे मंगल पाठ करण्यात आले. यावेळी जैन मंदिराचे ट्रस्टी भागचंद वेदमुथा, प्रदीप मुथा, नयन शहा, शांतीलाल बाबुलाल, विनोद बोथरा, दिलीप गांधी, किरण निबतिया, महेंद्र रंगवाला तसेच तसेच सुमीरा गांधी परिवारातील ऋषभ, प्रणेश, नमन गांधी,जैन बांधव, महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.