जळगाव – नेरी नाक्याजवळ असलेल्या नारखेडे हॉटेलवर विनापरवाना देशी विदेशी दारू विक्री करणाऱ्या आणि दारू पिणाऱ्या अकरा जणांवर सहाय्यक पोलीस अधिक्षकांनी कारवाई केली असून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
नेरी नाक्याजवळील एसटी वर्कशॉपजवळील नारखेडे हॉटेलवर विनापरवाना व बेकायदेशीर दारूची विक्री करत असणाऱ्या दोघांसह दारू पिणाऱ्या नऊ जणांवर सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाने काल सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास छापा टाकून कारवाई केली.
बेकायदेशीर दारू विक्री करणारे निलेश प्रभाकर भावसार (रा. कासमवाडी) आणि योगेश प्रकाश पाटील (रा. गोपाळ पुरा) यांना अटक केली. तर बिअरबार नसतांना दारू पिणारे सुखलाल तुकाराम भिल (वय-३८ रा. गावठाण उमाळा ता.जि.जळगाव), वणा राघो चव्हाण (वय-३८ रा. उमाळा ता.जि.जळगाव), सुभाष मधुकर पाटील (वय-४९ रा. तुकाराम वाडी), शशिकांत देविदास पाटील (वय-३० रा. गोपाळपुरा), निखील राजेश सोनवणे (वय-२२ रा. गणपती नगर कुसुंबा ता.जि.जळगाव), संतोष नारायण बेडीकर (वय-४९ रा. अनुराग स्टेट बँक कॉलनी जळगाव), योगेश मोहन मर्दाने (वय-३०), राजपुराण ढंडोरे (वय-२४ रा. गुरूनानक नगर) आणि संतोष श्रावण वाघ (वय-३८ रा. निफाळ ता.जि.नाशिक) यांनी ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातील ४४० रूपये किंमतीची देशी विदेशी दारू हस्तगत करण्यात आली आहे. याप्रकरणी पो.कॉ. मुद्दसर काझी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांच्या सुचनेनुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि अमोल मोरे, सपोनि संदीप हजारे, स.फौ. अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, पो.ना. मिलिंद सोनवणे, सुधीर साळवे व आरसीपी प्लाटून यांनी ही कारवाई केली.