जळगाव – काल रात्री १० वाजेच्या सुमारास भादली रेल्वेस्थानक परिसरात तालुक्यातील भादली गावात राहणाऱ्या तरुणाने धावत्या रेल्वेखाली झोकुन देत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.
कल्पेश चंद्रकांत नारखेडे असे मृत तरुणाचे नाव आहे. कल्पेश हा १६ रोजी काही मित्रांसोबत भादली परिसरात शेतात पार्टीसाठी गेला होता. यानंतर तो एकटाच तेथुन निघुन गेला. त्यानंतर कल्पेश याने रेल्वेखाली झोकुन देत आत्महत्या केलीची माहिती रात्री १० वाजता उघडकीस आली.
या घटनेमागचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही. घटनेनंतर नशिराबाद पोलिस ठाण्याचे कर्मचारी व भादलीच्या पोलिस पाटील अॅड. राधीका ढाके घटनास्थळी पोहोचले होते. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


