नवी दिल्ली : खासगी क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी एचडीएफसी बँक ने आणखी एक मोठा बदल केला आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये बँकेने एफडी व्याज दरातही बदल केला होता. त्यानंतर आता काही निश्चित ठेवींवरील व्याज दरात कपात केली आहे.
बँकेने दिलेल्या माहितीनुसार, 1 आणि 2 वर्षांत मुदतीच्या ठेवींचे व्याज दर कमी केले आहेत. तर इतर काळातील एफडीमध्ये व्याज दरामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. हे नवीन दर 13 नोव्हेंबरपासून लागू झाले आहेत.मोठा बदल! HDFC सह ‘या’ दोन बँकांनी FD व्याजात केली कपात, वाचा नवे दर.
एफडीवरील नवीन दर
HDFC बँकेच्या ग्राहकांना आता एक वर्षाच्या आणि 2 वर्षाच्या एफडीवर 4.90 टक्के व्याज मिळणार आहे. नव्या दरांनुसार आता 7 ते 14 दिवस आणि 15 ते 29 दिवसांत मॅच्यूरिटी होणाऱ्या एफडीवर ग्राहकांना 2.5 टक्के व्याज मिळेल. तर 30 ते 45 दिवस, 46 ते 60 दिवस आणि 61 ते 90 दिवसांच्या एफडीवर 3 टक्के व्याज मिळेल.
एफडीवरील व्याज दरात खासगी क्षेत्रातील अॅक्सिस बँकेनेही बदल केला आहे. 13 नोव्हेंबरपासून नवीन दर लागू करण्यात आले. अॅक्सिस बँक 7 ते 29 दिवसांच्या एफडीवर 2.50 टक्के, 30 दिवस ते 3 महिन्यांपेक्षा कमी एफडीवर 3 टक्के आणि 3 महिने ते 6 महिन्यांपेक्षा कमी एफडीवर 3.5 टक्के व्याज निश्चित केला आहे.
देशातील सर्वात मोठी सरकारी कर्जदार स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 7 ते 45 दिवसांत एफडीवर 2.9 टक्के व्याज आहे. 46 ते 179 दिवसांच्या ठेवींवर 9.9 टक्के, 180 ते 210 दिवसांवर 4.4 टक्के आणि 4.4 व्याज दिलं जातं आहे.
ग्राहकांसाठी एक ते दोन वर्षात एफडीवर 4.9 टक्के व्याज आहे, दोन ते तीन वर्षांच्या कालावधीत एफडीवर 5.1 आणि तीन ते पाच वर्षाच्या मुदत ठेवींवर 5.30 टक्के व्याज मिळत आहे. त्याचबरोबर 5 ते 10 वर्षांच्या मुदतीच्या एफडीवर 5.40 टक्के व्याज दिलं जात आहे.
अजून वाचा
सर्वोत्तम कामगिरी केल्यानंतर पुरस्कार आपल्याला मिळतो