पाळधी/धरणगाव, प्रतिनिधी – राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत धरणगाव तालुक्यातील शामखेडा येथील असंख्य युवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. युवानेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या पक्षप्रवेशामुळे शामखेडा परिसरात शिवसेनेची ताकद वाढल्याचा दावा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
या पक्षप्रवेशावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नव्याने पक्षात दाखल झालेल्या युवकांचे स्वागत केले. शिवसेना ही सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात धावून जाणारी संघटना आहे. भगवा खांद्यावर घेतल्यानंतर जनसेवेची जबाबदारीही स्वीकारावी लागते. गावातील गोरगरीब, शेतकरी आणि गरजू नागरिकांच्या मदतीसाठी शिवसैनिकांनी सर्वप्रथम पुढे आले पाहिजे. जनतेच्या अडचणी सोडविणे, हीच शिवसेनेची खरी ओळख असल्याचे त्यांनी सांगितले.
या युवकांनी बांधले शिवबंधन
शामखेडा येथील गणेश भिंगाणे, लोकेश सातपुते, किरण भिल, तुषार ढवळे, अक्षय गायकवाड, विकास भिंगाणे, आकाश भिल, मनोज सातपुते, नंदू सातपुते, प्रकाश सातपुते, घनश्याम भिल, आनंद भिल, गौतम शिंदे, अर्जुन शिंदे, सागर भिल, साहिल भिल, राजू भिल, करण भिल, अजय भिल, मनोज शिंदे, समाधान भिल आणि प्रल्हाद भिल यांच्यासह युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन युवानेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी केले, तर आभार शिवसेना तालुकाप्रमुख डी. ओ. पाटील यांनी मानले.
पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती
या वेळी विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख डी. ओ. पाटील, सचिन पवार, रवींद्र चव्हाण, मुकुंदराव ननवरे, दीपक भदाणे यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

