जळगाव – मृदंग इंडिया या जाहिरात संस्थेचे संचालक अनंत भोळे यांच्या पत्नी सौ. ज्योती अनंत भोळे (वय 49) यांचे गुरुवारी रात्री अल्प आजाराने उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने भोळे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परिचितांमध्ये शोककळा पसरली आहे.
ज्योती भोळे या प्रेमळ, मनमिळावू आणि आपुलकीच्या स्वभावासाठी परिचित होत्या. त्यांच्या अकस्मात निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या जाण्याने भोळे परिवाराने आपल्या कुटुंबातील एक जिव्हाळ्याची व्यक्ती गमावली आहे.
त्यांची अंत्ययात्रा शुक्रवार, दि. 21 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 वाजता त्यांच्या राहत्या घरातून, भागीरथ कॉलनी, जळगाव येथून निघणार असून नेरी नाका वैकुंठधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
ज्योती भोळे यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि भोळे परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच भावपूर्ण श्रद्धांजली.

