जळगाव – पायातील रक्तवाहिन्यांचे आजार, व्हेरिकोज व्हेन्स, न भरून येणाऱ्या जखमा, डायबेटिक फूट तसेच इतर रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांवर तज्ज्ञ उपचारासाठी अनुभवी व्हॅस्क्युलर व एंडोव्हॅस्क्युलर सर्जन डॉ. अमित राणे हे शनिवार, दि. २५ जुलै व रविवार, दि. २६ जुलै २०२६ रोजी जळगाव येथे रुग्णांची तपासणी व सल्ल्यासाठी उपलब्ध राहणार आहेत.
डॉ. अमित राणे यांनी एमबीबीएस, डीएनबी (जनरल सर्जरी), डीआरएनबी (व्हॅस्क्युलर सर्जरी) ही पदवी प्राप्त केली असून, वर्ल्ड फेडरेशन व्हॅस्क्युलर सोसायटी फेलोशिप, जिकेई युनिव्हर्सिटी, टोकियो (जपान) येथून विशेष प्रशिक्षण घेतले आहे. त्यांची ओपीडी तुषार पॅथॉलॉजी लॅबोरेटरी, महेश प्रगती मंडळासमोर, रिंग रोड, जळगाव येथे होणार आहे. शनिवार, २५ जुलै रोजी सकाळी ९ ते दुपारी १ आणि सायंकाळी ४ ते ७, तर रविवार, २६ जुलै रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत रुग्णांची तपासणी केली जाणार आहे.
या ओपीडीमध्ये व्हेरिकोज व्हेन्स, न भरून येणाऱ्या जखमा व अल्सर, चालताना किंवा विश्रांतीत पाय दुखणे, गँग्रीन, डीप व्हेन थ्रॉम्बोसिस (DVT), पल्मोनरी एम्बोलिझम, डायबेटिक फूट, एऑर्टिक अॅन्युरिझम, स्ट्रोकशी संबंधित रक्तवाहिन्यांचे विकार तसेच किडनी रुग्णांसाठी AV फिस्टुला मूल्यांकन यांसारख्या आजारांवर तज्ज्ञ सल्ला व उपचार उपलब्ध राहणार आहेत.
रुग्णांनी पूर्व-अपॉईंटमेंट घेऊनच भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व अपॉईंटमेंटसाठी ९८३३२ ८८८१८ या क्रमांकावर संपर्क साधावा.
रक्तवाहिन्यांच्या आजारांकडे दुर्लक्ष न करता योग्य वेळी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. वेळेत घेतलेला निर्णय तुमचे आरोग्य आणि अवयव दोन्ही सुरक्षित ठेवू शकतो,” असे आवाहन डॉ. अमित राणे यांनी केले आहे.

