Friday, July 10, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

शिवाजी नगर घरकुल परिसरात विशेष स्वच्छता मोहीम

नागरिकांना स्वच्छता आणि करभरण्याचे आवाहन

by Divya Jalgaon Team
July 10, 2026
in आरोग्य, जळगाव
0
शिवाजी नगर घरकुल परिसरात विशेष स्वच्छता मोहीम

जळगाव – जळगाव शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २ अंतर्गत छत्रपती नगर व शिवाजी नगर घरकुल परिसरात नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

नगरसेविका पूजा जगताप यांनी परिसरातील अस्वच्छतेबाबत तक्रार केल्यानंतर महानगरपालिकेने तातडीने कारवाई करत प्रभाग समिती क्रमांक १ व २ च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संयुक्त सहभागातून परिसराची व्यापक साफसफाई केली.

मोहीमेदरम्यान घरकुलधारकांना घरातील सांडपाणी थेट रस्त्यावर न सोडता भूमिगत गटार योजनेशी आउटलेट पाईपद्वारे जोडणी करण्याचे आवाहन करण्यात आले. यामुळे परिसरातील अस्वच्छता, दुर्गंधी तसेच साथीच्या आजारांचा धोका कमी होण्यास मदत होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.

याचबरोबर घरपट्टीची थकबाकी असलेल्या नागरिकांनी नियमित करभरणा करावे, असे आवाहन करण्यात आले. घरपट्टीचा नियमित भरणा झाल्यास महानगरपालिकेला विविध नागरी सुविधा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देणे तसेच अमृत पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाणी जोडणीची प्रक्रिया अधिक वेगाने राबविणे शक्य होईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

स्वच्छ, निरोगी आणि सुविधायुक्त परिसरासाठी नागरिकांनी स्वच्छता राखणे, भूमिगत गटार जोडणी पूर्ण करणे आणि स्थानिक करांचा नियमित भरणा करावा, असे आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात आले.

Share post
Tags: #Nagarsevika Puja jagtap#ShivajiNagar#मनपा
Previous Post

रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group