Wednesday, May 13, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

घरातून कोणीही निवडून नाही, तरी महासभेत कायम उपस्थिती; मनपात रंगली चर्चा !

by Divya Jalgaon Team
May 13, 2026
in जळगाव, राजकीय
0
घरातून कोणीही निवडून नाही, तरी महासभेत कायम उपस्थिती; मनपात रंगली चर्चा !

जळगाव – जळगाव महानगरपालिकेचा महासभांमध्ये शिवाजी नगर येथील एका माजी नगरसेवकाची नियमित उपस्थिती सध्या चांगलीच चर्चेचा विषय ठरली असून संबंधित माजी नगरसेवक हे प्रत्येक महासभेत सभागृहात नगरसेवकांप्रमाणे अखेरच्या बाकावर जाऊन बसत असल्याचे, तर कधी पत्रकारांसाठी राखीव खुर्च्यांवर बसत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांच्या सभागृहातील प्रत्येक कार्यक्रमात उपस्थितीमागे मनपाचा मोह दिसत असल्याची चर्चा आहे.

विशेष म्हणजे संबंधित माजी नगरसेवकांच्या घरातून अथवा नातेवाईकांमधून कोणीही सध्याच्या निवडणुकीत निवडून आलेले नसतानाही ते मनपाचा प्रत्येक कार्यक्रमात म्हजेच महापौर उपमहापौर निवड ते स्वीकृत नगरसेवकांपर्यंत ते मनपाचा महासभेत सभा संपेपर्यंत ठाण मांडून बसत असल्याचे अनेकदा दिसून आले.

महासभा ही निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींसाठी असताना माजी नगरसेवकांची सातत्याने उपस्थिती राहण्यामागचे कारण काय, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

याबाबत महापौर दीपमाळा काळे व उपमहापौर मनोज चौधरी यांनी दखल घेण्याची मागणी नगरसेवकांमधूनच होत आहे.

घरातून किंवा नातेवाईकांमधून कोणीही निवडून आलेले नसल्यावर ही माजी नगरसेवकांना महासभेत प्रवेश कशाच्या आधारावर दिला जातो, तसेच प्रत्येक सभेत त्यांच्या उपस्थितीमागचे नेमकं कारण काय, याची सखोल तपासणी करावी अशी मागणी ही केली जात आहे.

पत्रकारांसाठी राखीव जागांवर नगरसेविकांचे पती व मनपा कर्मचाऱ्यांचा वावर

मनपा महासभेदरम्यान पत्रकारांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या खुर्च्यांवर नगरसेविकांचे पती, नातेवाईक तसेच काही मनपा कर्मचारी बसत असल्याने पत्रकारांनाच बसण्यासाठी जागा उपलब्ध होत नसल्याचे चित्र महासभेत पाहायला मिळतं त्यामुळे महापौर दीपमाला काळे यांनी याबाबत होणारी गैरसोय बद्दल दखल घ्यावी.

Share post
Tags: #BreakingNews#CityPolitics#CivicPolitics#Dipmala Kale#JalgaonMunicipalCorporation#JalgaonNews#JalgaonPolitics#JMC#LocalPolitics#MaharashtraNews#manoj choudhry#PoliticalDiscussion#PoliticalNews#ShivajiNagar#TrendingNews#नगरसेवक#मनपा#महासभा#माजी_नगरसेवकJalgaonमहानगरपालिका
Previous Post

साळवा येथे खळ्याला आग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group