Wednesday, April 29, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

गॅस एजन्सी गोडाऊन फोडून सिलेंडर चोरी करणारी अट्टल टोळी जेरबंद; 4.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

by Divya Jalgaon Team
April 29, 2026
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
गॅस एजन्सी गोडाऊन फोडून सिलेंडर चोरी करणारी अट्टल टोळी जेरबंद; 4.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगाव – गॅस एजन्सीच्या गोडाऊनमध्ये घरफोडी करून मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडर चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी यशस्वीरीत्या जेरबंद केले आहे. या कारवाईत एकूण 4 लाख 27 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

फैजपुर व वरणगाव पोलीस ठाण्यांत दाखल दोन स्वतंत्र गुन्ह्यांच्या तपासादरम्यान ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी शेख बिलाल शेख नबी (वय 32, रा. कासोदा, ता. एरंडोल), वसीम खान शाबीर खान (वय 39, रा. तांबापुरा, जळगाव) आणि चेतन सुरेश काळे (वय 38, रा. नशिराबाद, ता. भुसावळ) या आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलीस तपासात उघड झाले की, आरोपींनी गॅस एजन्सीच्या गोडाऊनचे कुलूप तोडून आत प्रवेश करत मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडर चोरी केली होती. फैजपुर येथे 100 भरलेले सिलेंडर चोरीस गेल्याची तक्रार दाखल झाली होती, तर वरणगाव येथे 57 सिलेंडर चोरीचा प्रकार उघडकीस आला होता.

स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे संशयित वाहनांचा मागोवा घेत आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून चोरीस गेलेले सिलेंडर व एक सुझुकी बर्गमन मोपेड जप्त करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर, केदार बारबोले तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड व त्यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली.

सध्या आरोपींना फैजपुर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सैय्यद व विनोद गाभणे करत आहेत.

Share post
Tags: #Jalgaon #JalgaonPolice #TrafficPolice #RoadSafety #ModifiedSilencer #FancyNumberPlate #TrafficAction #MaharashtraNews #PublicSafety #SafeDriving #HelmetRules #NoMoreNoise#JalgaonNews #CrimeNews #GasCylinderTheft #PoliceAction #BreakingNews #MaharashtraNews #LocalCrime #DivyaJalgaon
Previous Post

नीट परीक्षेसाठी कडक नियम: 100 मीटर परिसरात प्रवेशबंदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group