जळगाव – इकरा एज्युकेशन सोसायटी संचलित इकरा एच. जे. थीम कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, मेहरुण तसेच इकरा मोहाडी कॅम्पस येथे क्रीडा विभागाच्या वतीने वार्षिक क्रीडा महोत्सव (Annual Sports Meet) मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेत महोत्सवाची शोभा वाढवली
कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार, सचिव एजाझ मलिक, माजिद सेठ जकरिया, इरफान सालार, युनानी मेडिकल कॉलेजचे प्राचार्य कारी कुद्दूस साहेब, इकरा पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक शकील सर तसेच मोहाडी कॅम्पसचे कार्यालय प्रभारी अफझल भाई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वकार शेख, प्रा. डॉ. युसूफ पटेल, मौलाना मुजम्मिलोद्दीन नदवी, प्रा. डॉ. इरफान शेख, प्रा. डॉ. अमीन काझी, प्रा. डॉ. साजिद मलिक, प्रा. डॉ. तनवीर खान, प्रा. उमर खान पठाण, प्रा. डॉ. राजू गवारे, प्रा. डॉ. सदाशिव डापके, प्रा. मुबश्शिर, अमीर काझी, आसिफ भाई, वसीम भाई तसेच इतर प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
क्रीडा महोत्सवातील क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार, सचिव एजाझ मलिक, माजिद सेठ जकरिया तसेच क्रीडा संचालक प्रा. डॉ. चांद खान यांच्या हस्ते क्रिकेट खेळून करण्यात आले. एफ.वाय., एस.वाय., टी.वाय., बी.ए. व बी.एस्सी.च्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उत्साहाने सहभाग घेतला.
अंतिम सामन्यात एस.वाय. बी.एस्सी. ‘डॉमिनेटर’ संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद पटकावले. या संघाला प्रा. डॉ. अमीन काझी व आमिर काझी यांचे मार्गदर्शन लाभले. तर टी.वाय. बी.एस्सी. संघ उपविजेता ठरला. या संघाला प्रा. डॉ. साजिद मलिक व डॉ. इरफान शेख यांचे मार्गदर्शन मिळाले. महिला विद्यार्थिनींसाठी लेमन-स्पून रेस, म्युझिकल चेअर आदी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. डॉ. फिरदौस शेख, प्रा. डॉ. अंजली कुलकर्णी, प्रा. डॉ. आयशा बासित, प्रा. डॉ. शबाना खाटीक, प्रा. डॉ. कहकशा अंजुम, प्रा. नसीन खान, प्रा. अंबरिन व इतर महिला प्राध्यापकांनी विशेष परिश्रम घेतले. क्रीडा संचालक प्रा. डॉ. चांद खान यांच्या कुशल नेतृत्वाखाली संपूर्ण क्रीडा महोत्सव यशस्वीरित्या पार पडला. महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी एकजुटीने परिश्रम घेतल्याबद्दल संस्थेच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आले.

