पाळधी – पाळधी येथील पाळधी येथील इंपिरियल इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी कृतिम बुद्धिमत्ता (एआय) या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित मार्गदर्शन पर कार्यक्रमाचे आयोजन आज दि. 19 डिसेंबर रोजी एसडी. सीड जळगाव यांच्यावतीने करण्यात आले.मध्ये विद्यार्थ्यांसाठी कृतिम बुद्धिमत्ता (एआय) या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित मार्गदर्शन पर कार्यक्रमाचे आयोजन आज दि. 19 डिसेंबर रोजी एसडी. सीड जळगाव यांच्यावतीने करण्यात आले.
या कार्यक्रमात एआय म्हणजे काय, एआयचा दैनंदिन जीवनात कसा उपयोग करता येईल तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासाशी संबंधित गृहपाठ, प्रोजेक्ट, परीक्षेची तयारी, स्वयंअध्ययन, करिअर मार्गदर्शन, गणितीय अभ्यास व मुलाखत तयारीसाठी एआयचा योग्य वापर कसा करावा याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी श्री. संजय चौधरी व सौ. प्रियंका चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमास डॉ. प्रसन्नकुमार रेदासानी, माजी शिक्षण अधिकारी श्री. गायकवाड सर तसेच शाळेचे अध्यक्ष इंजि. नरेश चौधरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


