जळगाव प्रतिनिधी । जळगाव महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान चारही स्वीकृत सदस्यांचे राजीनामे घेण्यात येणार असून त्यांच्या जागी नवीन सदस्यांची वर्णी लागणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. जळगाव महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या चारही स्वीकृत नगरसेवकांचा राजीनामा घेण्याच्या सूचना माजी मंत्री गिरीश महाजन यांनी महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांना दिल्या आहेत.
त्यानुसार दिवाळी संपल्यानंतर नवीन स्वीकृत सदस्यांच्या निवडीची प्रक्रिया राबवली जाणार आहे. राजीनामा घेण्याबाबत आ. गिरीश महाजन यांनी महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांना निर्देश देण्यात आले आहेत.दिवाळीची सुटी संपल्यानंतर राजीनामे घेऊन नवीन स्वीकृत सदस्यांची नियुक्ती होणार असल्याचे संकेत आता मिळाले आहेत.