जळगाव – विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त जळगाव येथील दूध फेडरेशन रोडवरील सुरत रेल्वे लाईन जवळील बुद्ध विहार येथे आज सकाळी बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले असून यावेळी नालंदा बुद्ध विहार समिती आणि पंचशील महिला विकास संस्थेचे पदाधिकारी व नागरिकांची उपस्थिती होती.
यावेळी सर्वांनी बाबासाहेबांचा प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात करून बाबासाहेबांनी ज्याप्रकारे शिकवण दिली त्याअनुसंघानेच सर्वांनी इतरांसाठी जीवन जगावे व सामाजिक ऐक्य, समानता आणि संविधानातील मूल्ये जपण्याचा संकल्प केला. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अनिल अडकमोल,शिवम सोनवणे, मेघना सोनवणे, राजू निकम, दीपक माने, दिलीप पोकळे, कुंदन निकम, आनंद सपकाळे, योगेश निंबाळकर, गणेश फेंगडे, सचिन सुरवाडे, विजय सुरवाडे, मुकेश जाधवसह आदी मान्यवर उपस्थित होते.

