Monday, December 1, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

माजी नगरसेवक अनंत जोशी कालवंश

राहत्या घरी घेतली गळफास ; कारण गुलदस्त्यात

by Divya Jalgaon Team
August 1, 2025
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
माजी नगरसेवक अनंत जोशी कालवंश

जळगाव – माजी नगरसेवक बंटी अनंत जोशी #यांनी आज सायंकाळी राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना घडली. बंटी जोशी महापालिकेचे माजी नगरसेवक असून काही काळ त्यांनी मनसेमध्ये होते. त्यांच्या आत्महत्येच्या कारणाचा अद्याप ही माहिती मिळाली नसून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात बंटी जोशी यांच्या समर्थकांनी प्रचंड गर्दी केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जळगाव शहर महानगरपालिकेतील नगरसेवक अनंत उर्फ बंटी जोशी (वय-५०) यांनी शुक्रवार दि. १ ऑगस्ट रोजी आपल्या जयनगर परिसरातील राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. सायंकाळी ७.३० च्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. नातेवाईकांनी बंटी जोशी यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

बंटी जोशी हे जळगाव मनपातील अभ्यासू नगरसेवक, हसत खेळत व्यक्तिमत्व असल्याने त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच नातेवाईक आणि मित्रपरिवारने जिल्हा शासकीय रुग्णालयात धाव घेतली. जिल्हा रुग्णालयात माजी महापौर नितीन लढ्ढा, विष्णु भंगाळे, सुनील महाजन, शरद तायडे, प्रशांत नाईक, सुनील झंवर, शामकांत सोनवणे, आयुष मणियार, पीयूष कोल्हे, पीयूष मणियार, सरिता माळी, कैलास आप्पा सोनवणे, कुंदन काळे, गणेश सोनवणे, प्रवीण कोल्हे, विशाल देवकर यांच्यासह मित्र परिवार जमला आहे.

माजी नगरसेवक अनंत जोशी हे ‘बंटी जोशी’ या नावाने जळगाव मध्ये प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते. त्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये बऱ्याच प्रमाणावर नागरिकांच्या समस्यांना सोडवण्यासाठी आवाज उठवला होता. महापालिकेमध्ये एक ‘अन्यायाविरुद्ध लढणारा नगरसेवक’ म्हणून त्यांची ओळख होती. विरोधक म्हणून त्यांनी लोकशाही मधील आपली भूमिका यशस्वीपणे मांडल्यामुळे जनमानसात त्यांना ‘बंटी भाऊ’ अशी ओळख निर्माण झाली होती. अन्यायाला वाचा फोडणाऱ्या या माजी नगरसेवकाच्या आत्महत्यामुळे समर्थक आणि मित्र परिवारामध्ये मोठ्या प्रमाणावर शोक व्यक्त होत आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पुढील तपास सुरू आहे.

Share post
Tags: #anant joshi#Anant joshi suisite#बंटी अनंत जोशीNagarsevak
Previous Post

रामराव तायडे राष्ट्रीय कामगार भुषण पुरस्काराने सन्मानित

Next Post

वैभव मावळे यांना नाट्यशास्त्रात पीएच.डी प्रदान

Next Post
वैभव मावळे यांना नाट्यशास्त्रात पीएच.डी प्रदान

वैभव मावळे यांना नाट्यशास्त्रात पीएच.डी प्रदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group