मुंबई – टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय व नायर रुग्णालय, मुंबई येथून नेहा संजय चौधरी यांनी MBBS ही वैद्यकीय पदवी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. महाविद्यालयाच्या MBBS 2019 बॅचचा पदवीप्रदान समारंभ दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी महापालिकेच्या आण्णाभाऊ साठे नाट्यगृह, भायखळा, मुंबई येथे अत्यंत उत्साहात पार पडला.
या समारंभात नेहा संजय चौधरी यांना कुलपती तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरविण्यात आले. नेहा ही मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी संजय चौधरी (एक्स-रे टेक्निशियन) यांची कन्या असून, त्या जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील नाचणखेडा या गावाच्या रहिवासी आहेत.
नेहा यांची ही शैक्षणिक कामगिरी त्यांच्या कुटुंबासह गावासाठीही अभिमानास्पद असून, त्यांच्या पुढील वैद्यकीय वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.


