Friday, December 5, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

अनुभूती निवासी स्कूलमधील विद्यार्थ्यांचे प्रोजेक्ट समाजाभिमुख सोल्युशन!

दोन दिवसीय भव्य विज्ञान प्रदर्शनाच्या समारोपाप्रसंगी तज्ज्ञांचा सूर

by Divya Jalgaon Team
February 15, 2025
in जळगाव, सामाजिक
0
अनुभूती निवासी स्कूलमधील विद्यार्थ्यांचे प्रोजेक्ट समाजाभिमुख सोल्युशन!

जळगाव – ‘विद्यार्थी दशेत असताना विज्ञान दिनानिमित्त प्रोजेक्ट केले जातात. अभ्यासक्रमाचा तो भाग असल्याने त्यात वेगळेपण कमी दिसते, मात्र अनुभूती निवासी स्कूलमधील विद्यार्थ्यांनी सादर केलेले प्रत्येक प्रोजेक्ट वैशिष्ट्यपूर्ण आहे. दैनंदिन जीवनात विज्ञानासोबत तंत्रज्ञानातून सोल्युशन दाखविणारे त्यांनी रोल मॉडेल सादर केले आहे. यातून मानवतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण समाजाभिमुख संशोधन पुढे येत आहे. त्यामागे विद्यार्थ्यांचा विज्ञान व तंत्रज्ञान, रोबोटिक्स, आर्टिफिशीयल इंटलीजन्सचा अभ्यासपूर्ण वापर दिसतो. खऱ्या अर्थाने विज्ञान, तंत्रज्ञान आत्मसात केले आहे.’ अशी प्रतिक्रिया ‘विज्ञानानुभूती विज्ञान प्रदर्शन’ बघण्यासाठी आलेल्या प्रशिक्षकांनी दिली.

अनुभूती निवासी स्कूलमध्ये दोन दिवसीय भव्य विज्ञान प्रदर्शनाचा आज समारोप झाला. त्याप्रसंगी जैन इरिगेशनचे वरिष्ठ सहकारी डॉ. जनमेजय नेमाडे, जे. एस. जैन, आर. बी. येवले, प्रदीप भोसले, सतीश खडसे, एस. सुकुमार, जयकिसन वाधवानी, अनुभूती निवासी स्कूलचे प्राचार्य देबासिस दास, यु. व्ही. राव, समन्वयक स्नेहल जोशी उपस्थित होते. विज्ञान प्रदर्शनात स्कूलचे शिक्षक, विद्यार्थ्यांचा समावेश होता.

युनायटेड नेशन्सने भविष्यकालीन विकासासाठी शाश्वत विकास ध्येये (Sustainable Development Goals) ठरवली आहेत. ही जागतिक ध्येये शाश्वत विकासासाठी प्रोत्साहन देणारी आहेत. एकूण १७ ध्येये असून या ध्येयांसाठी १६९ विशिष्ट ध्येये आहेत. त्याच धर्तीवर अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी रोबोटिक्स टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल तंत्रज्ञानासोबत विज्ञान, तंत्रज्ञान, फिजीक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, गणित यासह पर्यावरणीय संज्ञा विश्लेषणासह प्रोजेक्टद्वारे उलगडून दाखविल्यात. प्रदुषण, आरोग्य, पाणी, वीज, अन्नसुरक्षितता यासह आपत्तीजन्य परिस्थीतीत मनुष्याला पूरक बाबींवर संशोधनात्मक उत्तर देण्याचा प्रयत्न अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी केला. न्युटनचा साधा नियम यापासून तर रोबोटिक्स, एआय, इलेक्ट्रोमॅकनिकल अशा विषयांच्या प्रोजेक्टस् ची मांडणीसुद्धा विद्यार्थ्यांनी केली होती. विज्ञान आणि आपल्या दैनंदिन जीवनात ज्या गोष्टींचा उपयोग होतो अशा बाबींचा या प्रदर्शनात समावेश होता. आज प्रदर्शन बघण्यासाठी विविध शाळांनी भेटी दिल्यात आणि विद्यार्थ्यांच्या इन्व्होशनला प्रोत्साहित केले.

या प्रोजेक्ट सादरीकरण

मनुष्याच्या जीवनात सकारात्मक बदल करण्यासाठी रोबोटिक्स टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल तंत्रज्ञानातून शाश्वता यासह पाणी, वीज, शेती अशा विविध विषयांना धरून वेगवेगळे असे ५० च्यावर प्रोजेक्ट विद्यार्थ्यांनी स्वत: साकारून सादर केले आहे. त्यात थ्रीडी प्रिंटर टेक्नॉलॉजी, सीएनसी प्लॉटर मशीन, रडास सिस्टिम्स्, इन्फिनिटी मिरर, फायर फायटर रोबोट, लेसर सिक्युरिटी सिस्टिम्स्, वाईंड मील ट्री, शिलाई मशीन, एअर हॉकी, डेकोरेटिव्ह लाईट, लेसर सिक्युरिटी सिस्टिम्स्, पीन होल कॅमेरा, स्मार्ट डोअर अलार्म, आय ब्लिंक कार कंट्रोल, न्युटनचा नियम, इकॉलॉजी पिऱ्यामीड, मानवाचा सांगाडा (ह्युमन कलेटन), मानवी शरीरातील फुफ्फुसांचे कार्य, रोबोटिक्स, ब्रेक आऊट, आरजीबी कलर मिक्सिंग, पेंटाग्राफ, रडार सिस्टिम, एअर हॉकी, पिझो इलेक्ट्रीसिटी आणि व्हर्टिकल विंड जनरेटर, वॉटर रॉकेट असे अनेक विषयांवरील अत्याधुनिक प्रकल्पांची मांडणी अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी साकारली होती.

Share post
Tags: #Anubhuti English Medium School#Social activities#अनुभूती निवासी स्कूल
Previous Post

३८ व्या नॅशनल गेम्स साठी सोनल हटकरची पंच पदी नियुक्ती

Next Post

जजिमविप्र पतपेढीच्या तज्ञ संचालकपदी केतन पोळ यांची नियुक्ती

Next Post
जजिमविप्र पतपेढीच्या तज्ञ संचालकपदी केतन पोळ यांची नियुक्ती

जजिमविप्र पतपेढीच्या तज्ञ संचालकपदी केतन पोळ यांची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group