Wednesday, December 3, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आज ‘बंदे में हे दम’ संगीतमय कार्यक्रम

by Divya Jalgaon Team
January 29, 2025
in मनोरंजन
0
आज ‘बंदे में हे दम’ संगीतमय कार्यक्रम

जळगाव – महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त पूर्व संध्येला गांधी रिसर्च फाऊंडेशन आयोजित व परिवर्तन जळगाव निर्मित ‘बंदे में हे दम’ हा संगीतमय कार्यक्रम महात्मा गांधी उद्यान येथे आज दि. २९ रोजी संध्याकाळी ६.३० वाजता सादर होणार आहे.

महात्मा गांधी यांचे अनेक अपरिचीत पैलू व त्यांच्याविषयी असलेले अनेक समजगैरसमज याचा शोध घेणारा संगीतमय कार्यक्रम सादर होणार आहे. गांधी रिसर्च फाऊंडेशन महात्मा गांधी यांच्या जीवनावर व कार्यावर नेहमीच विविध उपक्रम राबवित असते. याच धोरणाच्या अंतर्गत पुण्यतिथीच्या निमित्ताने परिवर्तनच्या कलावंतांसोबत हा कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमाची संकल्पना जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांची आहे. दिग्दर्शक नारायण बाविस्कर तर संगीत दिग्दर्शक मंजूषा भिडे, वेशभूषा प्रतिक्षा कल्पराज, रंगभूषा लिलिमा जैन आणि बिना मल्हारा यांची आहे. निर्मिती प्रमूख विनोद पाटील व वसंत गायकवाड यांची असून हर्षल पाटील सूत्रधार आहेत. यात गोविंद मोकासी, श्रद्धा कुलकर्णी, सुदिप्ता सरकार, अंजली धुमाड, वरूण नेवे, योगेश पाटील, राहूल कासार, अक्षय दुसाने, रोहित बोरसे, मानसी आसोदेकर, जयश्री पाटील, वंदना नेमाडे, पियूषा नेवे हे कलावंत आहेत. सदर याकार्यक्रम सर्वांसाठी खूला असून रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन गांधी रिसर्च फाऊंडेशन व परिवर्तन जळगाव यांनी केले आहे.

Share post
Tags: # ‘बंदे में हे दम’#Gandhi Research Foundation गांधी रिसर्च फाऊंडेशन #Jalgaon #Jain Hills जैन हिल्स #Anubhuti Residential School #भवरलाल जैन Bhawarlal Jain #भाऊंचे उद्यान #Nisha Anil Jain#महात्मा गांधी#संगीतमय कार्यक्रम
Previous Post

जळगावात आजपासून बहिणाबाई महोत्सव

Next Post

ऑल इंडिया सिनेवर्कर्स असोसिएशनच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी ॲड.संजय राणे

Next Post
ऑल इंडिया सिनेवर्कर्स असोसिएशनच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी ॲड.संजय राणे

ऑल इंडिया सिनेवर्कर्स असोसिएशनच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी ॲड.संजय राणे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group