Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगाव महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांच्या विरोधात जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

by Divya Jalgaon Team
December 14, 2024
in गुन्हे वार्ता, तंत्रज्ञान
0
जळगाव महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांच्या विरोधात जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

जळगांव – येथील पत्रकार विक्रम कापडणे यांचा कॅमेरा हिसकावून घेणे व त्यातील मेमरी कार्ड काढणे, दमदाटी करणे याबाबत सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांच्यावर जळगांव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की पत्रकार विक्रम कापडणे हे जळगाव महानगरपालिकेच्या लेखा विभागाच्या बाहेर कॅमेऱ्याने शूटिंग करत असताना, सहाय्यक आयुक्त गणेश चाटे तेथे आले आणि त्यांनी त्यांचा कॅमेरा जबरदस्तीने हिसकावून घेतला एका कर्मचाऱ्याजवळ दिलाआणि त्यातील मेमरी कार्ड काढून घेतले. त्यानंतर महानगरपालिकेतून निघून जळगाव शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी विक्रम कापडणे यांनी सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांच्या विरोधात तक्रार क्रमांक: ७२३/२०२४.
कायदेशीर कलम: कलम ११५ (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

विक्रम कापडणे यांनी सांगितले की, उच्च न्यायालयाच्या निर्णयांनुसार कोणत्याही शासकीय कार्यालयात, विशेषतः सार्वजनिक हिताच्या दृष्टीने शूटिंग करणे कायदेशीर आहे. सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांना याबाबत माहिती दिल्यानंतरही त्यांनी अरेरावी केली व अधिकाराचा गैरवापर करत कॅमेरा काढून घेतला.

यावेळी घटना घडताना साक्षीदार म्हणून भांडारपाल आणि मनपातील काही कर्मचारी तेथे उपस्थित होते.

कायदेशीर दृष्टिकोन –

उच्च न्यायालयाच्या विविध निकालांनुसार, शासकीय कार्यालयांमध्ये पारदर्शकता टिकवण्यासाठी व जनहिताच्या मुद्द्यांसाठी शूटिंग करण्यास मनाई नाही. अशा परिस्थितीत, शासकीय अधिकारी जर त्यांच्या पदाचा गैरवापर करत पत्रकारांना काम करण्यापासून रोखत असतील तर तो कायद्याचा भंग मानला जातो.

या प्रकरणावर पोलीस तपास सुरू असून सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांची भूमिका व त्यांचा प्रतिवाद काय आहे, यावर तपशील येणे अपेक्षित आहे. तसेच, पत्रकार संघटनांकडूनही या घटनेचा निषेध केला आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील पारदर्शकतेसाठी पत्रकारितेचे महत्त्व असून, अशा घटना पत्रकारांना त्यांच्या कामापासून रोखण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप अनेक पत्रकारांनी केला आहे.

सदरील घटना ही सामाजिक कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना शासकीय कार्यालयात शूटिंग करण्यास मनाई आहे असं काही आपल्याकडे जजमेंट आहे का असा प्रश्न विचारल्यानंतर संबंधित अधिकारी हे निरुत्तरित झाले याच्यावरून कळते की अधिकाऱ्यांना कायद्याचे ज्ञान किती ? त्यानंतर सर्वांच्या साक्षीने गणेश चाटे यांनी संबंधित पत्रकारांचा कॅमेरा हा परत केला या सर्व घटनेत पत्रकारांचा कॅमेरा याचे काही नुकसान झाले आहे का किंवा त्याच्यातील काही महत्त्वाचे व्हिडिओ आहे डिलीट झाले आहेत का हे सविस्तर कॅमेरा ऑपरेट केल्यानंतरच कळेल.

Share post
Tags: #Ganesh chate#jalgaon mnpa cameraman mettar#mnpa aayuktCrime news
Previous Post

‘तावी’ ही जगातील अतिदुर्मिळ व किचकट शस्त्रक्रिया जळगावमधील ऑर्किड हॉस्पिटल येथे यशस्वी…

Next Post

अनुभूती निवासी स्कूलचा ‘फाउंडर्स डे’ उत्साहात संपन्न

Next Post
अनुभूती निवासी स्कूलचा ‘फाउंडर्स डे’ उत्साहात संपन्न

अनुभूती निवासी स्कूलचा 'फाउंडर्स डे' उत्साहात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group