जळगाव – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीच्या उमेदवार ॲड रोहिणी एकनाथराव खडसे यांनी कोथळी येथिल मतदान केंद्रावर सहपरिवार मतदानाचा हक्क बजावला. यावेळी माजी मंत्री आ एकनाथराव खडसे, सौ.मंदाताई खडसे, शारदाताई खडसे चौधरी, डॉ प्रांजल खेवलकर यांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावला.
यावेळी उमेदवार रोहिणी खडसे यांनी मतदारांना मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावण्याचे आवाहन केले. यावेळी त्या म्हणाल्या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन लोकशाही सुदृढ सशक्त होण्यासाठी आणि मतदारसंघाच्या विकासासाठी कोथळी येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.
लोकशाहीच्या या उत्सवात आपण सुद्धा सहभागी व्हा लोकशाहीने दिलेल्या मुलभूत अधिकाराचा वापर करून
मतदारसंघाच्या विकासासाठी सद्विवेक बुद्धीने मतदान करून मतदानाचा हक्क बजावावण्याचे त्यांनी मतदारांना आवाहन करून मुक्ताईनगर मतदारसंघात प्रचारासाठी मतदारांच्या गाठीभेटी घेत असताना मोठा प्रतिसाद मिळाला सर्व मतदारांचे आशिर्वाद आणि साथ आपल्याला लाभले असल्याचे सांगुन मतदारांच्या या आशीर्वादांच्या आणि साथीच्या पाठबळावर आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास ॲड रोहिणी खडसे यांनी व्यक्त केला.
यावेळी सरपंच नारायण चौधरी, योगेश चौधरी आणि पदाधिकारी उपस्थित होते