जळगाव – महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार सुरेश भोळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा जळगाव शहराला आमदार म्हणून राजू मामाच हवे आहे. आमदार राजु मामा भोळे यांच्या विजयासाठी जणु संपुर्ण शहर एकवटत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. राजु मामांचे नेतृत्त्व मान्य करीत शहरातील सुमारे २० हुन अधिक विविध समाज व संस्था यांनी आमदार भोळे यांना पाठींबा दिला आहे. या सर्व समाजबांधवांतर्फे बुधवारी होणाऱ्या मतदानात आमदार भोळे यांना मते दिली जाणार आहे.
जळगावकरांनी दाखविलेला विश्वास खरा करण्याचा आमदार भोळे यांचा प्रयत्न करत आहे. दरम्यान आमदार भोळे यांच्या परिवारातील सदस्य तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी प्रचारात आघाडी दाखवत जळगावकरांचे प्रेम मिळविले आहे. बुधवारी सकाळी ७ ते सायंकाळी ५ यावेळेत जळगावकरांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजवावा असे आवाहन करण्यात आले आहे.
या समाजबांधवांनी दिले पाठिंब्याचे पत्र
अखिल भारतीय मराठा महासंघ, चितोडगड बहुउद्देशीय संस्था, समस्त बारी पंच मंडळ, भोई समाज युवा फाउंडेशन, राष्ट्रीय लाहुशक्ती, प्रजाशक्ती क्रांती दल, देवांग कोष्टी समाज जळगाव, त्वष्टा तांबट समाज विकास मंडळ, संत नामदेव संस्कार शिंपी समाज फाउंडेशन, अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ, नवी दिल्ली शाखा महाराष्ट्र, श्री संत नामदेव महाराज बहुउद्देशीय संस्था संचलित नंदूशेठ जगताप शिंपी समाज युवा फाउंडेशन, श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज, महाराष्ट्र राज्य परीट धोबी समाज महासंघ सर्वभाषिक, जळगाव जिल्हा मूकबधिर असोसिएशन, वुलन मार्केट असोसिएशन, खंडेलवाल समाज व पाथरवट समाज महासंघ जळगाव, कंठहार वाणी समाज.