पाळधी /धरणगाव / – शिवसेनेचे पालकमंत्री आणि महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र प्रतापराव पाटील व विक्की बाबा या दोन्ही भावंडानी नेतृत्व केले, पाळधी गावाने आज एक ऐतिहासिक क्षण पाहिला – न भुतो न भविष्यती असा उत्स्फूर्त प्रतिसाद गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र प्रतापराव पाटील आणि विक्की बाबा यांच्या नेतृत्वाखालील प्रचार रॅलीला मिळाला.
रॅलीत दोन्ही गावाची एकजूटीने गुलाबभाऊंना भक्कम पाठींबा दिला, आणि “विकासाचा ध्वज उचलणाऱ्या गुलाबभाऊंच्या पाठींब्याचा ही गावाची एकजूट पावती आहे” असे ग्रामस्थही जाहीरपणे म्हणाले. विकास आणि एकजुटीचा विजय” – गुलाबभाऊंचे पाळधीमध्ये थरारक नेतृत्व असा अनुभव पहायला मिळाला. रॅलीत सहभागी कार्यकर्त्यांचे उत्साह, भगव्या झेंड्यांची लहर, आणि ग्रामस्थांची एकजूट अनुभवायला मिळाली. यावेळी दोन्ही गावांचे सरपंच , महायुतीचे पदाधिकारी ग्रामस्थ, तरुणाई मोठ्या संख्यने उपस्थित होती.*