जळगाव – जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघातील महायुती व शिवसेनेचे उमेदवार तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज येथील जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांची भेट घेवून आशीर्वाद घेतले.
प्रचारादरम्यान जात असतांना त्यांच्या गाड्यांचा ताफा जैन हिल्सकडे वळला. तिथे जाऊन त्यांनी ना. पाटील यांनी उद्योगपती जैन यांची भेट घेतली.
यावेळी दोघा मान्यवरांमध्ये चर्चा झाली, त्यात जळगाव जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने आगामी काळात कोणते प्रकल्प हाती घ्यावेत? विकासासाठी काय काय उपाययोजना कराव्या? विशेषत: शेतकऱ्यांसाठी काय करता येईल? यासंदर्भात गुलाबराव पाटील आणि अशोकभाऊ जैन यांचेत चर्चा झाली. जिल्ह्यातील शेतीचे प्रश्न, पीक विमा, शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव आदी संदर्भात उद्योजक जैन यांनी काही महत्वपूर्ण सूचना केल्याचे नंतर गुलाबराव पाटील यांनी बोलतांना सांगीतले. ते म्हणाले की, भाऊंच्या सूचनांचा मी आदर करतो. आगामी काळात महायुती सरकार राज्यात पुन्हा सत्तेवर येणार आहे. तेव्हा या सूचनांचे पालन आम्ही करणार आहोत.