रावेर – रावेर विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धनंजय शिरीष चौधरी यांनी अज सकाळी पाडळसे येथील भोरगाव लेवा पंचायत येथे जाऊन दिवंगत कुटुंबनायक विठू पाटील व रमेशदादा पाटील यांना वंदन करुन त्यांचे अशीर्वाद घेतले तसेच विद्यमान कुटुंबनायक ललितदादा पाटील यांचाही आशीर्वाद घेतला.
यावेळी आमदार शिरीषदादा चौधरी, लिलाधर विश्वनाथ चौधरी, रमेश रामचंद्र महाजन, धनंजय बऱ्हाटे, सुनिल फिरके, सौ. गिता चौधरी, केतन किरंगे, देवेंद्र बेंडाळे आणि बापू पाटील यांचेसह पंचायतीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केली की, स्व. मधुकरराव चौधरी यांचे समाजावर मोठे उपकार आहेत. त्यांनी समाजाला ओबीसी वर्गातून आरक्षण मिळवून दिलेले आहे. त्यामुळे आपल्या अनेक मुलांना उच्च शिक्षण घेवून विविध उच्च पदांपर्यंत पोहचता आले आहे. त्यांचे ऋण फेडण्यासाठी यंदा संपूर्ण समाज हा धनंजय चौधरी यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करेल असा आशावाद व्यक्त केला.
भोरगाव लेवा पंचायतीसाठी स्व. बाळासाहेबांनी नेहमीच मदतीचा हात दिला होता. त्यांच्या पुढाकाराने पहिले महाअधिवेशन संपन्न झाले होते, ज्यात समाजसुधारणेचे अनेक महत्वाचे निर्णय घेतले गेल्याचे वयोवृद्धांनी यावेळी सांगीतले.